नागपंचमी
(श्रावण
शुदध पंचमी)
भारतात
नाग-साप
यांना देव मानले जाते.
काही नाग
मानवाला उपकारक तर काही विषरी
नाग-साप
अपकारक मानले
जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या
सणाची निर्मिती झाली आहे.या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट
सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील
लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी).

तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही
यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग
काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे
पुढीलप्रमाणे आहेत.
१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र
नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिध्द मानले आहे. कारण
वरील क्रीया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोरण्याची शक्यता असते असे मानले जाते.

नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर मेंदी काढतात व नवीन बांगडया
भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात.
या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी
बोलावून लोक त्याची पूजा करतात. या दिवशी पुरणाची किंवा साखर-खोब-याची
दिंडे बनवतात.
महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेडयातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुध्दा
तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. कितीही विषारी नाग-साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत
नाहीत अशी लोकांची श्रध्दा आहे.
नारळी
पौर्णिमा ( श्रावण
शुध्द पौर्णिमा)
समुद्राकाठी
रहाणा-या
प्रामुख्याने कोळी लोकांचा
हा महत्त्वाचा सण आहे.
पावसाळयात
समुद्र खवळलेला असतो.
बोटी,
जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा
व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा
आहे. . समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार
लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.

म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात
राखी
पौर्णिमा (श्रावण
शुध्द पौर्णिमा)
हाच
दिवस राखीपौर्णिमा म्हणून
साजरा केला जातो. या
दिवशी बहिणी आपल्या भावाला
राखी बांधतात. भावाने
आपले रक्षण
करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात.
करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात.
याच
दिवशी लोक श्रावणी करतात.
या दिवशीचे
मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात.
तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे
पदार्थ करून हा सण साजरा करतात.
तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे
पदार्थ करून हा सण साजरा करतात.
गोकुळ
अष्टमी (श्रावण
वद्य अष्टमी)
राम,
कृष्ण,
विष्णू व शंकर
ही भारतीयांची आराध्य दैवते
आहेत. श्रीकृष्ण
तर त्याच्या गोकुळातील बाललीला,
यमुनेवरील
रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला
जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी
होय.

या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना
त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने
कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. ही कथा सर्वज्ञात आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-
पांडव युध्दात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ
अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्वजण ह्या दिवशी उपवास
करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून
वाटतात.
ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात
निजवतात. त्यास तोडे, साखळया असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.
दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे
एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही, साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट
उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून
दहीहंडी
फोडतात. आतील
पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना
वाटतात. दहीहंडी
फोडण्यासाठी
हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.
हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.
गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वतःला
मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो
चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले
कार्य सिध्दीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन
ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.
नवरात्र
उत्सव
पावसाळा
सरतो आणि थंडीचा मागोवा देणा-या
शारदाची नांदी लावत अश्विन
मास अवतरतो. त्याच्या
शुध्द प्रतिपदेपासूनच
नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. अश्विन महिन्याच मूळ नाव आहे 'ईष'. 'ईष म्हणजे उडून जाणे जेव्हा गेले अनेक
महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा 'ईष' म्हणजे अश्विन मास सुरू होतो. त्याच्या प्रारंभापासूनच सुरू होणा-
या या नवरात्रोत्सवाच मूळ काय? हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेच
सर्वप्रथम प्रकटलेल सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी 'दुर्गम'
नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. वर म्हणून त्यान, देवांच्या नाडया आखडणारे
प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीच भय पसरल. जागोजागीच्या आश्रमातील
ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेन आदिमायेची करूणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिन उन्मत दुर्गम
असुराला वधल. दुर्गमला वधल म्हणून ही दुर्गा. त्याचा 'दुर्ग' म्हणजे किल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दुर्गेचीच दुसरी नाव
काली, अंबा, भवानी अशी पुढे विस्तारीत झाली. दुर्गेच्या असुरांवरील विजयाच प्रेरणास्मरण म्हणून विजयादशमी.

हा विजयादशमीचा नवरात्रोत्सव, संवत्सरांचे व्यापक संस्कार घेत घेत सीमोल्लंघनापर्यंत विस्तारित झाला. आपल्या प्रत्येक
सणात वर्षांवर्षांची आशी नवीच भर पडत गेलेली दिसेल.
दुर्गादेवीच्या या मूळ उत्सवात रावणवधाचा जल्लोष मिळाला. खंडेनवमीच्या दिवशी पांडवांचा शमीवृक्षावरून शस्त्रे उतरवून
विराटाच्यावतीने अरिजुनान कौरवांवर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव यात अंतर्भूत झाला.
आजचा हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहान देशभर साजरा होतो.
दुर्गापूजेच्या रूपात बंगालात साजरा होतो बंगालचा तो सर्वाधिक महत्वाचा सण आहे.
नवरात्रोत्सव, विजयादशमी व सीमोल्लंघन असा पूर्ण प्रगत झाला. पुढे शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा
सीमोल्लंघनाच्या पायडयाने नवरात्राला एक जबरदस्त ऐतिहासिक परिमाण बहाल केल आहे.
नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी
मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व
कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या
गादीवाफ्यात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. ही पहिली रात्र
असते. या दिवशी घटाजवळ एकदा शिलगावलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवता राहणार असतो. (प्राचीन अखंड
अग्निहोत्र व्रताचच हे बाळप्रतीक होय.) हा घटस्थापनेचा दिवस.
पुढे प्रत्येक दिवशी विपुल अशा झेंडूच्या किंवा तीळाच्या फुलांची एक एक चढत्याक्रमाची भरगच्च माळ या घटावर टांगली
जाते. प्रत्येक दिवसानुसार तिला पहिली, दुसरी, तिसरी माळ म्हणतात. या काळात पाऊस पडलाच तर तो माळेत सापडला
आता किमान नऊ दिवस तरी पूर्ण होईतोपर्यंत हटणार नाही. अशी बुजुर्ग चर्चा करतात. ती अनुभवसिध्द असते.
नवरात्रात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एकएका पाठाचे सविध पठन केले जाते. काही घराण्यात त्यांची
म्हणून आदिमायेच रूप मानलेली कुलदेवी असते. तिच्या स्तुतीचे पाठ असलेल्या त्या त्या घराणांच्या पोथ्या असतात. त्यांचेही
पठन या काळात केले जाते.
नवरात्राच्या नऊ दिवसात शेवटचे ८, ९ व १० हे दिवस फार महत्वाचे आहेत.
विशेषत: ८ व्या दिवशी दुर्गेच्या नावाने कोरडा शिधा जोगवा मागण्याची पध्दत आजही काही घराण्यात चालू आहे. यासंदर्भात
एक ऐतिहासिक व ठोस संदर्भ सदैव ध्यानात ठेण्यासारखा आहे. पुढे १६७४ साली रायगडावर बत्तीस मणी संपन्न सुवर्णी.
सिंहासन उठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर व नंतर रायगडावरही स्वत:ला भवानीचा भक्त (भुत्या)
मानून असा जोगवा मागितला होता.
नवव्या दिवशी हवन होऊन दहाव्या दिवशी या उत्सवाच समापन होत. या दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हणतात.ओदल्या
नवव्या रात्रीला 'खंडेनवमीची माळ' म्हणतात. या दिवशी सर्व शस्त्रे पूजली जातात. काही मराठा घराण्यात बकरी पडतात.
आलीकडे बदलत्या विज्ञानयुगानुसार दुर्गाभक्त व्यवसायाप्रमाण डॉक्टर असेल तर स्टेथॉस्कोप, शस्त्रक्रियेची अवजारे,
विद्यार्थी असेल तर पेन-पुस्तकेही या दिवशी पूजतात. त्यावर झेंडूच्या माळा वाहतात.
विजयादशमीला आपटयाची किंवा शमीच्या वृक्षाची पान 'सोन' म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरू झाली. पेशवाईत सरंजाम,
नगारा, नोबत्ती याची त्यात उत्साही वाढ झाली.
महाराष्ट्रात आज गावोगाव 'दसरामाळ' आहे. या माळावर चिवाटयांच्या बंदीस्त चौकात गावचा गुरव भल्या पहाटेच
आपटयाच्या किंवा शमीच्या फाद्यांचे ढिग आणून रचतो. संध्याकाळी गावच्या तालेवार मानकऱ्याकडून हा 'सोनचौक' सर्व
प्रथम फोडला जातो. मग गावकऱ्यांची चौकातील सोन लुटण्यासाठी तिथ झुंबड उडते. हाती लागतील ते ठाळे अपूर्वान हाती
वागवीत गावकरी गावाच्या ग्रामदैवताला प्रथम सोन वाहतो. मग आपल्या सर्व गावबंधुंना हे सोन देण्यासाठी त्याचा
मित्रगणांसह ग्रामदौरा सुरू होतो. शेमल्यात पिवळयाजर्द कोभांचे तुरे रोवलेले शिवरायांचे मऱ्हाटमोळे ग्रामीण एकमेकांना
हातच्या सोन्याची पान देतांना हटकून म्हणतात.-सोन घ्या-सोन्यासारख- ऱ्हावा। आमच सोन सांडू नगा । आमच्यासंग भांडू
नगा। ' ते एकमेकांना निकोप गावरान प्रेमा देत उराउरी भेटतात. त्यावेळी त्यांच्या फेटाच्या शेमल्यात खोवलेले देखणे कोंभ
लयीत मागेपुढे उठतात. ते बघतांना खरा महाराष्ट्र खळतो.
शिवकाळापासून 'सिमोल्लंघनाला' फार महत्व आल. मावळे सैनिक जवळजवळ सर्वच शेतकरी होते. ते आपआपल्या गावाकडे
पावसाळाभर शेतकामात राबत.
पावसाळा संपला की, मळणी, आबादानी आवरून मावळा आपल्या बुद्रक, खुर्द वस्तीची शिव (सीमा) ओलंडून निघे. त्याच्या
कमरेला तलवार असे, हाती भाला पेललेला असे, पाठीवर ढाल आवळलेली असे. आता तो शिवरायांच्या सेनेचा 'धारकरी'
असे, हे सीमोल्लंघन तो विजयादशमीच्या सोनवाणाच्या मुहूर्तावर करे. आता त्याला 'जिकडं पूढा-तिकड मुलूख थोडा.' अस.
मैसूरात दस-याच्या या दिवशी नाना रंगी झुली पांघरलेले शेकडो हत्ती 'दसरा मिरवणूकीसाठी' रस्त्यावर येतात. बंगालात
फक्त दुर्गापूजा व तिच स्तवन यासाच महत्व असत.
महाराष्ट्रात विजयादशमीचा मुहूर्त धरून गावाची सीमा ओलांडण्याचा विधी आजच करायचा असतो हे प्रतीक पराक्रमाच
आहे.
तशी वर्षभरात आणखीही चार नवरात्रे लोक संपन्न करतात.
पण महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकांसमोर नऊ रोज नऊ माळा टांगून,
विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोन वाटतो. दुस-या दिवशीच पाठीला खंडेनवमीची
पूजलेली हत्यार पेलत नवरात्रीची कात चाकून विजयादशमीचे पराक्रमाचे नवकोंभ मिरवत-सीमोल्लंघन करतो हे आगळ
वेगळ वाटत नाही काय? नक्कीच वाटेल सशक्त मनोबैठक असेल तर तशी दृष्टी असेल तर.
हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)
हरतालिका
हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला
पती म्हणून मिळावा यासाठी
केले होते असे मानले जाते.
तेव्हांपासून
आपल्याला
जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा
जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. मंगळागौरीच्या
पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा म्हणून वाळूची पिंड
करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे
रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.

पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी
बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत. . रात्री बारा वाजता रूईच्या पानावर
मध घालून चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून
उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा
वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी
स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.
दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत
बैल
पोळा (श्रावण
वद्य अमावास्या)
भारत
हा शेतीप्रधान देश आहे.
पारंपारिक
पध्दतीने शेतीसाठी बैलाची
अनमोल मदत घेतली जाते.
बैल वर्षभर
शेतात राबत
असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे
म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी
शेतकरी बैलांना अंघोळ घालून सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल घालून सजवतात. बैलांना वाजत गाजत
मारूतीच्या दर्शनाला नेतात. त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात. संध्याकाळी बैल वाजत गाजत आले की त्यांची पूजा
करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात ज्यांचा शेती हा व्यवसाय नाही ते लोक या दिवशी मातीच्या बैलाच्या मूर्ती विकत
आणून पाटावर गहू पसरून त्यावर बैल मांडून त्यांची पूजा करतात. जेवणात पुरणपोळी हे प्रमुख पक्वान्न केले जाते.

मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)
मंगळागौरीची
पूजा म्हणजे उमा-शंकराची
पूजा. पतीपत्नीमधील
आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा
आदर्श म्हणून या दांपत्याकडे
पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न
झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची
कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात.
या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच
खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती,
तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर,
शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इ.साहित्याची गरज असते.
ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू,
विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळया, मटकीची उसळ,
वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा
मंगळागौरीची आरती करतात.
रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगडया, झिम्मा, भेंडया असे खेळ खेळतात. सकाळी उठल्यावर स्नान
करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला
हलवल्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी यांपैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात.
या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.
मंगळागौरीचे उद्यापन करावयाचे असल्यास त्यासोबत कोणाचीतरी मंगळागौर करावी लागते. त्या मंगळागौरीबरोबर आपल्या
व्रताचे उद्यापन करतात. उद्यापनाचे वेळी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी भटजींना बोलावतात. तांब्याच्या तांब्यात पाणी,
अक्षता, आंब्याचा डहाळा ठेवून कलशाची पूजा करतात. मंगळवारी पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना
बोलावतात. ज्या ठिकाणी होमहवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई-वडिलांना द्यायचे असते. आई-
वडील जर नसतील तर भाऊ-भावजय यांना हे वाण देऊन उद्यापन करतात.
काजळ, दोन हिरव्या बांगडया, गळेसरी वगैरे सौभाग्यवाण, तांब्याच्या तपेल्यांत सोन्याचा लहानसा नाग घालून त्याला दादरा
बांधून व लाडू असे वाण देण्याची प्रथा आहे. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात. आईला मणी-मंगळसूत्र व जोडवी
देतात. मंगळागौरीच्या मुलींना खण किंवा कापड देतात. जिने मंगळागौरीचे उद्यापन केलेले असते तिला मणी-मंगळसूत्र,
जोडवी, साडी, खण देतात.
मकरसंक्रांत
सूर्य
एका राशीतून दुस-या
राशीत जाणे यालाच 'संक्रमण'
म्हणतात.
मकर राशीमध्ये
सूर्य जाणे यालाच 'मकर
संक्रमण '
असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक 'संक्रांत' हा
सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या
इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत.
संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून
उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.

संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व
असते. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो.सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात. सुगडाचा
वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-
याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा
शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन ,
चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडाच्या वशामागचा हेतू
आहे. संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकढे तूप वाढण्याची प्रथा आहे.
संक्रांतीच्यावेळी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया,
काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.
नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास
काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात.
त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या
वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.
सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व 'तिळगुळ घ्या - गोड बोला' असे म्हणतात.
आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. ज्यांचे संबंध
चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.
संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे 'बोरनहाण'
केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा,
तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो.
घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. या सणानिमित्त शुभेच्छापत्रे
पाठविण्याचीही पध्दत आहे.
अक्षय तृतीया
अक्षय
तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु
यांच्या मिश्र लहरी उच्च
देवतांच्या लोकांतून,
म्हणजे
सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात.
त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.
त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.
अर्थ
: सदोदित
किंवा सातत्याने सुख व समृद्धि
प्राप्त करून देणार्या
देवतेची अक्षय तृतीयेच्या
दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून
केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित
आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.
केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित
आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.
मूर्तिका
पूजन : सदोदित
कृपादृष्टि ठेवणार्या
मूर्तिकेमुळेच आपल्याला
धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी
व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति
होते.
अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
मातीत
आळी घालणे व पेरणी : पावसाळा
तोंडावर घेऊन अक्षय तृतीया
येते. वर्षाऋतूच्या
आगमनाचा, म्हणजे
मृग नक्षत्राचा
व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.)
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे
नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी
मशागत केलेल्या जमिनीतील मूर्तिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मूर्तिकेमध्ये आळी घालावीत व
त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य
पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या
आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)

(पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने
सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना
मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात
होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न
केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)
वृक्षरोपण
: अक्षय
तृतियेच्या शुभमुहूर्तावर
आळी करून लावलेल्या फळबागा
भरघोस फळ उत्पादन देतात.
तसेच आयुर्वेदात
सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी
वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.
सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी
वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.
अक्षय
तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित
वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे
पूजन करण्याचे महत्त्व :
अक्षय तृतियेच्या
दिवशी राजाने
किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी
श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते.
लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही,
तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही
रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे
उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.

गुरुपौर्णिमा गुरू पूजनाचा दिवस
आपल्या
भारतीय संस्कृतीत मध्ये
देवदेवता ह्यांना जितके
महत्त्व आहे. त्यापेक्षा
थोड अधिकच आहे ते गुरू आणि
सद्गुरू
यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार
मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.

आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत,
आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा
हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो
पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या
जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.
अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.
खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे
प्रत्यक्ष आचरण करणे.
सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत.
तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.
सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥
किंवा
सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी आधी ॥
ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.
उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन
स्वामी व एकनाथ. ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा
वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेत नमन.
त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती.
असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव
करत असते.
त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याच उदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून
घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.
गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.
महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात.
गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास
पूर्ण शब्द बाहेर येतात की..
सद्गुरू साईखा असता पाठीसारखा ।
इतरांची लेखा, कोण करी ।
दिवाळी
एक
आनंदोत्सव :
दिवाळी, होय… दिवाळी म्हणजे खरोखरच सर्व सणांची महारणीच. ती महाराणी म्हणूनच तिचा मोठा थाट आणि ती येते ही
अखंड दिव्यांच्या झगमगाटात.
आकाश
कंदिल लाघले दारांत
उजळल्या ज्योती दीप अंगणांत
सडा सन्मार्जने सजल्या अंगणी
आली आली आली सणांची ही राणी
दिवाळीचे
दुसरं नांव दीपावली. हा
उत्सव म्हणजे दीपोत्सव.
दिव्यांचा
उत्सव दिव्यांच्या असंख्य
ओळी घराअंगणात लावल्या
जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.
जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.
ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले,
स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील
वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की
कायवसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी
होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे
महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या
दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान
करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या
दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी
शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे
आनंद साजरा करण्याचे कारण आहे.
अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन
वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल
सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या
दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा
केला जातो.
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या
दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.
कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला
स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्लाकरणे, त्यावर चित्रे
मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व
उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि
ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो.
दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.
गणेशवोत्सव
वक्रतुंड
महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं
कुरू मे देव सर्व कार्येषु
सर्वदा ॥
नमस्कार!
आपल्या आयुष्याला
चैतन्याचा, मांगल्याचा,
प्रसन्नतेचा
साज चढवणारा गणेशोत्सव सुरू
झालाय. आरतीचे
स्वर
ऎकू येत आहेत. सुवासिक अगरबत्ती, सुगंधी फुलं यांनी आसमंत भरून गेलाय. फळं, फुलं, पत्री, दुर्वा, विविध प्रकारच्या
मिठाया, सजावटीचं सामान यांनी बाजारपेठा फुलून गेल्यात. एकंदरीत काय अनंतचतुर्दशीपर्यंत वातावरण भारलेलं असणार

गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या आनंदाचा, अभिमानाचा आणि भक्तिभावाचा विषय आहे. सर्वजनिक गणेशोत्सवाला तर शंभर
वर्षाहून मोठी परंपरा आहे.
गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने तर दरवर्षीच साजरा होतो. पण आपलं जे दैवत आहे त्याच्या गुणांचं अनुकरण करणं, त्याच्या
वागण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त होणं म्हणजेच त्याची खरी उपासना आहे याचा मात्र विसर पडायला नको.
‘गणेशाची गुणाने पूजा बांधणे’ हे केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजहिताच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनेही आवश्यक ठरतं.
गणेश ही देवता सर्वसमावेशक आहे. मानवी जीवन सर्वांगाने फुलावं – बहरावं अशी शिकवण गणपती बाप्पा आपला
सखासांगाती आहे. सर्वच क्षेत्रात असाधारण बुद्धीमत्ता आणि डोळे दीपवणारे कर्तुत्व दाखविणाऱ्या गणपतीचं आज घराघरात
पूजन होत आहे. गणपती बाप्पापुढे नतमस्तक होताना आपण एका पराक्रमी परोपकारी नेतृत्वाची पूजा करत आहोत ही
भावना मनात हवी. भारताच्या इतर भागातही गणपतीचं पूजन होतं.
कोकणात गणेशोत्सवाची मोठी धमाल असते. गावात साजरा होणारा गणेशोत्सव वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. कोकण मुळातच
पारंपारिकतेवर प्रेम करणारा आहे. गणेशोत्सव हा कोकणातला महाउत्सव आणि खवळे महागणपतीची तर ख्यातीच न्यारी.
एकाच ठिकाणाहून एकाच प्रकारची माती आणून एकाच वजनाची मूर्ती दरवर्षी घडवणारा ३१३ वर्षांची परंपरा असलेला
गणपती म्हणजे खवळे महागणपती. पहिले चार दिवस सफेद नंतर संपूर्ण रंगकाम केलेला आणि विसर्जनाच्या दिवशी पिवळे
ठिपके दिलेला असा २१ दिवसात २१ रुपात दिसणारा हा एकमेव महागणपती आहे.
मूर्ती घडवण्यासाठी पाटावर माती ठेवल्यापासून नवस बोलला जाणारा देवगड तालुक्यातील नाडणचा सार्वजनिक गणपती
आहे. या गणपतीवर येथील नागरिकांची अपार श्रद्धा आहे.
मुर्तीकामासाठी माती पाटावर ठेवल्यानंतर अगरबत्ती धुपारतींनी पूजा होते. गेल्या तीन पिढ्या मोठ्या श्रद्धेने पूजला जाणारा
गणपती चित्रशाळेत असेपर्यंत चतुर्थीपर्यंतचे दिवस अगदी मंतरलेले असतात.
मालवण तालुक्यातील कोईल गावात ‘एक गाव एक गणपती’ ही प्राचीन काळापासून सुरु असलेली संकल्पना. या गावातले
लोक गावाबाहेरील मातीतून कोणतीही मूर्ती घडवित नाहीत आणि कुठल्याही भागातील मातीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार
करत नाहीत. गावातील गणपती मंदिरातील पाषाणाची यथासांग पूजा होते. कोईलमध्ये गणपतीची विसर्जन मिरवणूक निघत
नाही. त्याऎवजी फुलपात्री आणि निर्माल्य गंगापर्ण केलं जातं. गावचा गणपती एकच. या गावात गणेशाचं कोणत्याही
अवतारातलं अथवा कोणत्याही कलाकृतीतलं छायाचित्र ग्रामस्थांच्या घरात आढळून येणार नाही. अशाप्रकारे
कोकणप्रांतात गणपतीचं आगळंवेगळं महत्व आहे.
गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या आनंदाचा, अभिमानाचा आणि भक्तिभावाचा विषय आहे. सर्वजनिक गणेशोत्सवाला तर शंभर
वर्षाहून मोठी परंपरा आहे. या गणेशोत्सवाने महाराष्ट्राला नेते, अभिनेते, वक्ते, कार्यकर्ते दिले. जनसामान्यांमध्ये देशाभिमान
जागविला. लोकमान्य टिळकांनी प्रत्येक वर्षाच्या गणेशोत्सवात जी भाषणं दिली त्यातील प्रत्येक भाषण म्हणजे संजीवनी
मंत्रच आहे. असा हा मराठी मातीत रुजलेला मराठी मनाला मोहवून टाकणारा मराठी माणसाच्या जीवनाशी समरस झालेला
गणेशोत्सव.
कलीयुगात गणपतीचं नाव धूम्रवर्ण असं आहे. धूम्र म्हणजे धूर. अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या प्रदूषणाच्या काळात हे नाव किती
यथार्थ आहे हे वेगळं सांगायला नको. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपतीकडे चांगलं अर्थपूर्ण आयुष्य
जगण्यासाठी बुद्धी आणि शक्तीचं वरदान मागूया.