प्रदोष व्रत
प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे. प्रदोष वेळेस हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत असे म्हणतात. हे भगवान शंकराचे व्रत आहे. हे व्रत करणार्याने, त्या दिवशी सकाळपासून उपवास करावयाचा असून सायंकाळी सूर्यास्ताचे वेळी आंघोळ करावयाची असते. त्यानंतर, शिवाची षोडशोपचार पूजा करावयाची असते.
प्रदोष वेळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे ३ घटिकापर्यंतची (सुमारे १ तास १२ मिनिटे) वेळ होय.
शनिप्रदोष हे पुत्रसंततिप्राप्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.शनिवारी प्रदोष म्हणजे त्रयोदशी असतांना शनिप्रदोष होतो
अर्कप्रदोष हे आयुरारोग्यवृद्धीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.रविवारी त्रयोदशी तिथी आली असता अर्कप्रदोष होतो.
सोमप्रदोष' हे आनंद, शांतिरक्षणासाठी व पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो.
भौमप्रदोष हे कर्जमुक्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.मंगळवारी त्रयोदशी तिथी आली असता भौमप्रदोष होतो.
बुधप्रदोष सर्व प्रकारच्या पापातून मुक्त करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.
बृहस्पतिप्रदोष अथवा गुरुप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, अशी धार्मिक कल्पना आहे.. पुराणातल्या एका कथेनुसार गुरुप्रदोष व्रताच्या साहाय्याने इंद्राने वृत्रासुरावर विजय प्राप्त केला होता. गुरुवारी त्रयोदशी ही तिथी आली असता, तो दिवस बृहस्पतिप्रदोष होतो, आणि त्या दिवशी त्याच नावाचे व्रत करतात.
शुक्रप्रदोष हे व्रत धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्ति साठी केले जाते. तसेच भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठीही हे व्रत केले जाते.शुक्रवारी त्रयोदशी तिथी आली असता शुक्रप्रदोष होतो.