पुजेशी संबंधित या वस्तू ठेवू नयेत घरात, यामुळे वाढते गरिबी
देवाची पूजा करताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा उपयोग करतो.
काही वस्तू स्थायी स्वरूपात पूजेसाठी वापरल्या जातात तर काही वस्तू वारंवार खरेदी करून आणाव्या लागतात.कधीकधी आपण नकळतपणे पूजेसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू तशाच घरामध्ये ठेवतो आणि त्यामुळे नकारात्मकता वाढते.यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही आणि घरात दारिद्रतेचे आगमन होते.
सुकलेले हार-फुलं
घरामध्ये पूजा केल्यानंतर देवाला हार-फुलं अवश्य अर्पण केले जातात. पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कधीकधी हे हार-फुलं घरातच राहतात. अशाप्रक्रारे सुकून गेलेले हार-फुलं घरात ठेवणे अशुभ मानले जातात. यामुळे असे हार-फुलं घरातील कुंड्यांमध्ये टाकावेत किंवा नदीमध्ये प्रवाहित करावेत.
सुकलेले तुळशीचे रोप
घरामध्ये तुळस लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि जे लोक नियमितपणे तुळशीची पूजा करतात त्यांना धर्म लाभासोबतच आर्थिक आणि आरोग्य लाभ प्राप्त होतात. एखाद्या कारणामुळे तुळशीचे रोप सुकले तर ते घरामध्ये ठेवू नये. असे रोपटे अशुभ मानले जाते. सुकलेले तुळशीचे रोप एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करावे.
फुटलेला दिवा
पूजेमध्ये नेहमी अखंडित दिव्याचा उपयोग करावा. तुम्ही जर मातीचा दिवा देवासमोर लावत असाल आणि तो तुटक-फुटका असेल तर अशा प्रकारच्या दिव्याचा पुजमध्ये उपयोग करू नये. असे दिवे घरातून काढून टाकावेत.
खंडित मूर्ती
देवघरात किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकराची खंडित मूर्ती असू नये. जर मातीची एखादी मूर्ती खंडित झाली असेल किंवा धातूची मूर्ती काही कारणामुळे दुभंगली असेल तर अशा मूर्ती घरामध्ये ठेवू नयेत. अशाप्रकारची मूर्ती एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी किंवा एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करावी.