जय गजानन
*पारायणाचे प्रकार*
संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वेगवेगळ्या उपासना नियमित सुरु असतात. परन्तु कधी कधी वेगवेगळ्या संकल्पनातील फरक समजण्यात चुका होतात करिता खालील गोष्टी लक्षात घ्याव्या.
*पारायण म्हणजे काय?*
आपले गुरु, संत किंवा देव ह्यांच्या अधिकृत चरित्राचे, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनांवर बसून, पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन-पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या / दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण.
खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेऊन केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही
• केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन
• दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन
• दुसर्या पेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही
• केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन
• मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन
• बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन
*पारायणाचे विविध प्रकार*
*एकआसनी पारायण* – एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणार्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.
*एकदिवसीय पारायण* - एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बर्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण.
जागतिक पारायणदिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे.
वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.
*सप्ताह पारायण* – सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केल्या जाते. महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधीदिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो
*तिन दिवसिय पारायण* – तिन दिवस दररोज ७ अध्याय ( किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केल्या जाते. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तिन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे. मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो
*गुरुवारचे पारायण* – गुरुवार हा महाराजांचा शुभदिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत लाभ मिळतो. एका ग्रुप मध्ये एकविस भक्तच भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे. जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.
*चक्री पारायण* किंवा २१ दिवसीय पारायण – खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय (पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसर्या दिवशी सर्वांनी दुसरा ... एकविसाव्या दिवशी सर्वांनी २१ वा अध्याय वाचणे) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन हि सेवा उपासना करतात. ह्यामधे भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
*संकीर्तन पारायण* – एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप असावे. हि एक श्रवण भक्ति आहे.
गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. हि सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेंव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.
*सामुहिक पारायण* – एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. हरकत नाही.
*काही आयोजक संकीर्तन पारायणालाच सामुहिक पारायण संबोधतात. परंतु माझे मते त्यात बराच फरक आहे.*
संकीर्तन पारायणात प्रत्येक भक्त ग्रंथ वाचूच शकत नाही कारण त्याने व्यासपीठावरील भक्ताचे मुखोद्गत पारायण ऐकायचे आहे. त्यातच खरी मजा आहे. श्रवण आणि वाचन अशा दोन्ही क्रिया एकाच गतीने सोबत करणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे इतर श्रोत्यांकडून अध्याय वाचनाची अपेक्षा करणे म्हणजे व्यासपीठावरील भक्ताचा सन्मान कमी करण्यासारखे आहे. त्यांचे वाचन व निरुपण आपण कसे ऐकणार कारण आपण तर पारायण करीत आहे. म्हणून अशा पारायणामध्ये चांगल्या प्रतीच्या ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करून ते सुश्राव्य करावे. हे पारायण एकाच भक्ताचे ग्राह्य मानावे व इतरांनी जे केले ती श्रवणभक्ति.
दुसरे असे की प्रत्येकाची वाचन गती वेगवेगळी असते त्यामुळे सोबत वाचणे शक्य होत नाही.
बरेचदा फक्त काही भक्त पारायणाच्या सुरुवातीपासून असतात व बरेचसे भक्त हे उशिरा येतात. ते पारायण कसे पूर्ण करू शकतील? हा मोठा प्रश्न आहे. (यावर आयोजकांनी विचार करायला हवा)
म्हणून जेंव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त भक्तांनी पारायण करावे असे अपेक्षित असेल तर सामुहिक पारायण आयोजन करून प्रत्येकाला त्याच्या वाचन गतीनुसार पारायण करण्याची मुभा देणे आवश्यक आहे.
*गण गण गणांत बोते*